AurangabadNewsUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन

औरंगाबाद जिल्ह्यात कलम 144 नुसार संचारबंदी लागु
अत्यावश्यक बाबी /सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील
औरंगाबाद । दिवसेंदिवस वाढत असलेला शहरातील कोरोना संसर्ग लक्षात घेता अखेर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शहर आणि जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊनचे आदेश निर्गमित केले असून या दरम्यान १४४ (१) (३) कलमानुसार संचारबंदी लागू केली आहे .
या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे कि , कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून जिल्ह्यात वेळोवेळी अंशतः लॉकडाऊनचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. मात्र सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यात कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने औरंगाबाद जिल्हयाच्या हद्दीत मंगळवार दिनांक 30.03.2021 चे मध्यरात्री 00.00 वाजेपासून ते गुरुवार दिनांक 08.04.2021 चे 24.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक बाबी वगळता नागरिकांची हालचाल पूर्णपणे प्रतिबंधीत राहिल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारांविरुद्ध गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
यावर पूर्णपणे प्रतिबंध असेल
1. सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी.
2. Morning walk, Evening walk पूर्णतः बंद
3. उपहार गृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, शॉपींग मॉल, बाजार, मार्केट संपूर्णतः बद राहतील.
4. हॉटेल मधील आसनव्यवस्थेसह जेवणाची सूविधा (डायनिंग) बंद राहिल मात्र निवासी असलेल्या यात्रेकरुना त्यांच्या खोलीमध्ये भोजन व्यवस्थेस परवानगी राहिल.
5. सर्व केश कर्तनालय/सलुन/ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील.
6. शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील.
7. स्थानिक ,सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी वाहतूक संपूर्णतः बंद राहतील. वैद्यकीय कारण अपवाद वगळता.
8. स्थानिक , सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील.
9. सर्व प्रकारचे बांधकाम / कन्स्ट्रक्शनची कामे संपूर्णतः बंद राहतील.
10. सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील.
11. मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ, वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस असे कार्यक्रम सार्वजनिकरित्या करता येणार नाहीत. या आदेशानुसार लागू करण्यात येत असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह अनुज्ञेय असेल.
12. सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील.
13. धार्मिक स्थळे/सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील. तथापी नियमित दैनंदिन धार्मिक विधी पुजाअर्चा चालू राहतील. याकामी संबंधीत पुजारी/धर्मगुरु/पाद्री इ. यांचेसह फक्त एका व्यक्तीस परवानगी राहिल.
14. सर्व प्रकारचे मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषण इ. वर निर्बंध राहतील.
15. सर्व देशी/विदेशी वाईन इ.मद्य विक्रीचे दुकाने बंद राहतील.
16. विविध निवडणूकीच्या निकालानंतर विजयी मिरवणूकीस बंदी असेल.
या सेवा निर्बंधासह सुरु राहतील.
1. वैद्यकीय, आपत्कालीन सेवा सुरु राहतील.
2. विक्रेते व दुकानदार : किराणा मालाची ठोक विक्री करणारे दुकाने सकाळी 8.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्यांना दुपारी 12.00 पर्यंत विक्री व घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल. परंतु दुपारी 12.00 नंतर दुकान उघडे ठेवता येणार नाही.
3. भाजीपाला व फळांची विक्री, दूध विक्री व वितरण सकाळी 6.00 ते 11.00 वाजेपर्यंत अनुज्ञेय राहिल. त्यानंतर विहित पध्दतीने घरपोच पुरवठा सुध्दा करता येईल. तथापी दूध संकलन विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल.
4. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी ची विक्री सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत चालू राहतील. त्यानंतर घरपोच विहित पध्दतीने सेवा देता येईल. सर्व नागरिकांना आपल्या घराजवळ असलेल्या दुकानावर खरेदीला जाणे अपेक्षित आहे.
5. ज्याठिकाणी ग्राहकांना आत प्रवेश देवून खुली खरेदी केली जाते अशा सुपर मार्केट्स मध्ये (डी मार्ट, सुपर मार्केट,बिग बाझार, प्रोझोन मॉल, इत्यादी) सकाळी 8.00 ते 12.00 या वेळेत फक्त किराणा व भाजीपाला (Grocery), अंडे, मासे, चिकन इ. विक्रीस परवानगी राहिल. तथापी इतर बाबींच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी राहिल. त्यानंतर घरपोच साहित्य वितरीत करता येईल.
3. उद्योग
• सर्व प्रकारचे उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील. मात्र त्यांना जिल्ह्यात कोठेही थांबता येणार नाही.
• दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल /प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील.
• सर्व ऑनलाईन सेवा सुरु ठेवता येईल.
4. रुग्णालये व औषधी सेवा त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील.
• सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही, अन्यथा संबंधित संस्था कारवाईस पात्र राहिल.
• सर्व औषध दुकाने, ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्यात असलेली सर्व औषध विक्री दुकाने त्यांच्या विहित वेळेनुसार सुरु ठेवता येतील.
• संस्थात्मक अलगीकरण/विलगीकरण व कोव्हीड केअर सेंटर करता शासनाने ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.
• रुग्णवाहिका व शववाहिका यांना कुठलेही निर्बंध असणार नाही.
• विविध प्रकारच्या आरोग्य विषयक चाचण्यांसाठी खाजगी पॅथॉलॉजीकल लॅबच्या तंत्रज्ञास घरी जाऊन स्वॅब गोळा करणे इ.साठी परवानगी असेल.
5. अंत्यविधी : अंत्यविधीसाठी फक्त 20 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल.
6. प्रवासी वाहतूकिस परवानगी असेल. सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्यक आहे.सदरील प्रवाशांना RT-PCR/ रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट करणे बंधनकारक राहिल. प्रवाशांनी सदरील चाचणी 72 तासांच्या आत केली असल्यास सदरील अहवाल सोबत ठेवणे आवश्यक आहे.
• महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ / खाजगी बस सेवेमार्फत नियमित व रात्रीच्या प्रवासी वाहतुकीस परवानगी राहिल.
7. सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बॅंक नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरु राहतील. बॅंकेच्या इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील.
8. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
• स्वस्त धान्य दुकाने पूर्णवेळ सुरु राहतील. त्याठिकाणी सामाजिक अंतर राखणे व मास्क वापरणे बंधनकारक राहिल.
9. . कृषि विषयक सर्व व्यवहार सकाळी 8.00 ते 12.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. इतर वेळी घरपोच सेवा देता येईल.
10. रोजगार विषयक व इतर मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. Covid-19 शिष्टाचार पाळून कामाच्या ठिकाणी शारीरीक अंतर ठेवावे.
11. सेवाभावी संस्था /NGO इ.जे गरजू नागरिकांना जेवण इत्यादी मदत देवू इच्छीतात ते पूर्व परवानगीने विहीत ठिकाणी व वेळेत हे कार्य करु शकतात.