MumbaiCoronaUpdate : आमिर खानला कोरोनाची बाधा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर लावली होती उपस्थिती

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त असून सध्या आमिर खान क्वारंटाईन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमिर खानने दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘वर्षा’वरील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासात कोरोनाचा शिरकाव झाला असून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाने गाठल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं आहे . दरम्यान आता तर दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासोबत हजेरी लावणाऱ्या अभिनेता आमिर खानलाही कोरोना झाला असल्याने मुख्यमंत्र्यांनाही गृह विलगीकरणात जावे लागते कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.