ArnabGoswamiNewsUpdate : अर्णब गोस्वामीला अटक करण्याबाबत न्यायालयाने दिले हे निर्देश

मुंबई : रिपब्लिक भारत टीआरपी घोटाळ्याप्रकरणी १२ आठवड्यांत तपास पूर्ण करु अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. दरम्यान यावेळी उच्च न्यायालयाने रिपब्लिक भारत वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी सुनावणीदरम्यान आतापर्यंत कारवाईपासून दिलेला दिलासा न्यायालयाकडून रद्द करण्यात आला.
या प्रकरणात न्यायालयाने महत्वाचे आदेश देताना अर्णब गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आउटलियर मीडिया या कंपनीची याचिका दाखल करुन घेतली. टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण द्यावे, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीसाठी गोस्वामी आणि एआरजी आउटलियर मीडिया कंपनीने हि याचिका केली होती. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे.
#BombayHighCourt to continue hearing the plea filed by #Republic assailing the criminal proceedings initiated against them by #MumbaiPolice in the #TRPSCAM case today.@republic @MumbaiPolice pic.twitter.com/NNBlDncjeD
— Bar and Bench (@barandbench) March 24, 2021
दरम्यान गोस्वामी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर संशयित आरोपीची टांगती तलवार किती दिवस ठेवणार? तपास असाच सुरू ठेवता येऊ शकत नाही अशा मुद्द्यांवर न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलीयर कंपनीसंबंधी अटकेची कारवाई करायची असल्यास तीन दिवस आधी नोटीस द्यावी असा आदेश न्यायालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान दिला.