Maharashtrabudget2021 : सभागृहात सुधीर मुनगंटीवारांनी दिली आजीतदादांना ऑफर

अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये सत्ताधारी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला आहे. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, पण देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावेच लागेल, अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही’ अशी ऑफरच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होतो. यांनी आमची कवचकुंडलं काढली. विदर्भ आणि मराठवाड्याचा 1 टक्के निधी कमी केला. दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर विसंबून राहू नका’, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. नाना पटोले हे मध्येच बोलायला उभे राहिले असता ‘आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका’ असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. दरम्यान, ते म्हणाले की, मला प्रश्न पडला आहे की, अजितदादा तुमच्यावर टीका करायची का नाही. कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावेच लागेल. अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही, अशी ऑफरच मुनगंटीवार यांनी यावेळी आजीत पवार यांना दिली. तसेच ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा’ असे विधानही मुनगंटीवार यांनी विधानसभेत केले आहे.
महात्मा गांधी सेवा अनुदानासाठी 25 हजारांची तरतूद केली आहे. आज गांधीजी असते तर ते हाताची काठी घेऊन मागे लागले असते. राज्यात पहिल्यांदाच दरडोई उत्पन्न कमी झाले आहे, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली. अनिल देशमुख यांचे वक्तव्य दुर्देवी होते. ठाकरे सरकारला ठार करे सरकार करायचे आहे का? काही पक्षांचे चीन वर प्रेम आहे काही जणांचे सचिनवर (वाझे) प्रेम आहे. हे सरकार शरम प्रुफ आहे. आरोपींना वाचवण्यासाठी विदर्भातल्या माणसाला गृहमंत्रिपद दिले. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. त्यानंतर अनिल देशमुख बोलायला उभे राहिले, ‘मुनगंटीवार यांनी सगळ्या मंत्र्यांची नावे घेतली. पण तुम्ही देवेंद्रजींपेक्षा सीनियर होतात पण मुख्यमंत्री ते झाले. तुमच्या मनातले दुःख मला कळत होते. तुम्ही खोटे हसून ते सांभाळत होतात. तुम इतना क्यू मुस्करा रहे हो ? क्या गम है जिसको छुपा रहे हो’ असा टोला अनिल देशमुख यांनी मुनगंटीवार यांना लगावला.