Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘खोटे बोल पण रेटून बोला’ असं फडणवीसांचं विधान आहे : अशोक चव्हाण

Spread the love

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वाद पेटला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, खोटे बोल पण रेटून बोला असे फडणवीसांचे आहे, असा पलटवार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेली विधाने चुकीची आहेत. खोटे बोल पण रेटून बोला अशा प्रकारचे त्यांचे विधान आहे. मी कोणतीही चुकीची माहिती विधानसभेत दिलेली नाही. मराठा आरक्षण लागू झाले पाहिजे हीच आमची भावना आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने जी भूमिका मांडली, तेच मी विधानभवनात सांगितले आहे. फडणवीस म्हणतात की, तो जुनाच कायदा आहे व 102 ची घटनादुरूस्ती लागू होत नाही. मग केंद्र वेगळी भूमिका का घेत आहे? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थितीत केला आहे. तसेच, आरक्षण हा राजकीय पक्षाच्या मालकीचा विषय नाही. तेव्हा सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. राजकारण करू नका. लोकांना उसकवण्याचे काम करू नये भाजपने राज्यात एक व केंद्रात दुसरी भूमिका घेवू नये. हक्कभंगाला मी उत्तर देईन असे प्रत्त्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले होते की, सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज मराठा आरक्षण संदर्भात खोटे निवेदन केले आहे. 102 ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. अॅटर्नी जनरलसंदर्भातील वक्तव्य चुकीचे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, मुकुल रोहतगींनी सांगितल्यानुसार त्यांना अॅटर्नी जनरलनी पाठिंबा दिला आहे. अॅटर्नी जनरलच्या विरोधात चुकीची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. आमच्या सरकारच्या काळात केलेला कायदा कसा निरस्त आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असेही फडणवीस म्हणाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!