Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : आई -वडिल रागावले मुलाने अल्पवयीन घेतला गळफास , जाणून घ्या मनोविकार तज्ज्ञांचे मत

Spread the love

औरंगाबाद – इयत्ता १० वी मधे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने आई वडिल रागावल्यामुळे आज (मंगळ) संध्याकाळी ६वा.गळफास घेतल्याची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. दरम्यान अशा प्रकरणावर मनोकार तज्ज्ञ डॉ . डाॅ.मेराज कादरी यांनी महानायक ऑनलाईनशी बोलताना पालक आणि कुटुंबियातील संवाद हरवत चालल्याने अशा घटना घडत असल्याचे म्हटले आहे.

रोहित दिपक बनसोडे(१५) रा.शंभूनगर गादिया विहार असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आई वडिल दोघेही मजूरी करंत आहेत. मयत रोहित हा दिपक बनसोडे यांचा मोठा मुलगा होता. त्याला अजून दोन लहान बहीण भाऊ आहेत. घटना घडली त्यावेळी दोन्ही बहीण भाऊ शेजारी खेळत होते. व आई वडिल कामावर गेलेले होते.

या घटनेवर शहरातील मनोविकार तज्ज्ञ डाॅ.मेराज कादरी यांनी मत व्यक्त केले की, मुलांचा आई वडलांशी सुसंवाद संपत चालला आहे. मुलांना सर्व सुविधा तर मिळतात पण आई वडलांचे प्रेम मिळंत नाही.मनुष्य हा कोणत्याही प्रवर्गात काम करणारा असो पण तो हे नक्की करतो की, आपल्या मुलाला हव्या त्या वस्तू देऊ पण तो आपल्या अपेक्षे प्रमाणे शिकला पाहिजे. पालकांच्या या अपेक्षेने मुलं दडपणाखाली वावरतात.त्याच प्रमाणे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर त्वरीत व्हायरल होतात. त्याचाही वाईट परिणाम अपयश मिळालेल्या मुलांवर होतो. व नकळंत ते त्या मार्गाला जातात. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.

पालकांना आवाहन

माझे पालकांना आवाहन आहे की, मुलांना सुविधा दिल्यानंतर त्यांच बालपण हिरावून घेऊ नका, त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवून त्यांना रागवू नका सोशल मिडीयापासून मुलांना जितके दूर ठेवता येईल तितके ठेवा. मुलांशी सतत संपर्कात रहा त्यावेळी तुम्ही कुठेही असाल तरी चालेल.संपर्काच्या बाबतीत मोबाईलचा चांगला उपयोग करायला हवा.मुलांना मैदानी खेळ खेळू द्या, त्यांचा काॅलनीतील गल्लीतील मुलांशी संवाद वाढू द्या.काही वर्षांपूर्वी  संध्याकाळची जेवणं झाल्यानंतर काॅलनीत किंवा गल्लीत सगळे लोक  एकत्र येऊन विविध विषयांवर गप्पा मारायचे वाद घालायचे हे समाजात घडले पाहिजे. सोशल मिडीयाचा जसा चांगलाउपयोग आहे तसे नुकसानही आहे.याच भान आज समाजातील प्रत्येकाने ठेवल्यास अल्पवयीन मुलांवर अशी दुर्देवी वेळ येणार नाही.

काही वर्षांपूर्वी शहरातील तत्कालीन पोलिसआयुक्त संजयकुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना वैयक्तिक मत व्यक्त केलं होत की, माध्यमांनी आत्महत्येचे वृत्त प्रसारित करणे टाळावे कारण बातमी प्रसिध्द झाल्यानंतर कोण निराशेच्या गर्तेत आहे आणि कोण त्याचा गैरफायदा घेईल हे सांगता येणे अवघड आहे. वरील दोन्ही जबाबदार नागरिकांनी मांडलेली मते अत्यंत महत्वाची आहेत.आणि समाजाने ते आचरणात आणले तर दुर्देवी घटना घडणे टळू शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!