राष्र्टवादी काॅंग्रेसचे जफर बिल्डरवर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

औरंगाबाद – राष्र्टवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते जफर बिल्डर यांच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. सबळ पुरावे प्राप्त झाल्यानंतर जफर यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
३मार्च रोजी जफर यांची पत्नी फरजाना यांनी विष प्राशन करंत आत्महत्या केली होती. २०१५साली दोघांचा निकाह लागला होता. या घटने नंतर जफर यांचा मेव्हणा रईस अय्यूब सय्यद(४१) रा.रोशनगेट तक्रारीवरुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेख हारुण करंत आहेत. दरम्यान २८जानेवारी २१रोजी गृहमंत्री अनिल देशमुख है बैठकीसाठी शहरात आले तेंव्हा आरोपी जफर बिल्डर व नगरसैवक मतीन ज्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे दौघांनीही गृहमंत्र्यांसोबंत फोटोसेशन केले होते.