वाळूज औद्योगिक पोलिसांकडून चार मंगळसूत्र चोर्या उघडकीस, तिघांना बेड्या

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक पोलिसांनी ४ मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.त्यामधे ५७ग्रॅम.सोने जप्त करण्यात आले. त्यामधे सातारा, जवाहरनगर, सिडको या पोलिस ठाण्यांमधील गुन्ह्यांचाही समावेश आहे.
रामदास दिलीप बनकर(२१) अंकुश भगवान वजीरे(२०) दोन्ही रा. विटावा या दोघांना वैजापूर पोलिसांकडून वर्ग करुन घेतले. तर चोरीचा माल खरेदी करणारा लासूर स्टेशन येथील काकासाहेब लक्ष्मण मांगे (३४) रा.देवळा लासूर स्टे. अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरील आरोपींना सी.सी. टि.व्ही. फुटेज वरुन निष्पन्न करण्यात आले. वरील दोन्ही आरोपी मंगळसूत्र चोर्या करतांना गुन्ह्यात वापरत असलैल्या मोटरसायकल ची नंबर प्लेट उलटी करुन कोर्या नंबरप्लैट वापरुन चोर्या करत होते. वरील कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गौतम वावळे, पीएसआय राजेंद्र बांगर,पोलिस कर्मचारी कय्यूम पठाण, प्रकाश गायकवाड,दिपक मतलबे, हरिकराम वाघ यांनी पार पाडली.
गॅस रिफिलिंग च्या गुन्ह्यात एक अटक
औरंगाबाद – अहमदनगर हायवेवर घरगुती गॅसचा वापर रिफिलिंग करण्यासाठी वापरणार्या एका आरोपीस आज दुपारी ३ वा. सातारा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून ३०गॅस सिलेंठडर, इलेक्र्टीक वजन काटे आणि इतर साहित्य मिळून दोन वाहने असा १लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील कारवाई पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलिसांनी पार पाडली. पुढील तपास पीएसआय शेवाळे करंत आहेत.