AurangabadNewsUpdate : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारासहित एकाला बेड्या, 5 गावठी कट्टे आणि 28 जिवंत काडतुसे जप्त

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक पोलिसांनी शनिवारी दुपारी सापळा रचून रेकाॅर्डवरच्या आरोपीसहित त्याच्या साथीदाराला ५गावठी कट्टे आणि २८जिवंत काडतुसासहित अटक केली.या प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन मुराब पवार (२९) रा.रामगव्हान वस्ती बुद्रुक आणि सुंदर भाऊसाहेब काळे(१९) रा. हिवरारोशनगाव अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असून सचिन पवार वर शहागड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. वरील दोन्ही आरोपी औद्योगिक परिसरातील वैष्णोदेवी मंदीरा जवळील राॅयल हाॅटेल मधे ग्राहकाची वाट बघत बसले होते. सचिन पवार कडे एक कट्टा दोन जिवंत काडतुसे तर सुंदर काळे कडे ४कट्टे आणि २६जिवंत काडतूसे असा मुद्देमाल होता. वरील दोघांना पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या आदेशावरुन एपीआय गौतम वावळे यांनी पथकासहित सापळा रचला होताच. वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेत गावठी कट्टे आणि काडतुसे जप्त करण्यात आली. वरील कारवाईत पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज औद्योगिक पोलिसांनी सहभाग नोंदवला. या कारवाईत पोलिस कर्मचारी कय्यूम पठाण, नवाब शेख, प्रकाश गायकवाड,मनमोहनमुरली कोलिमी, सुधिर सोनवणे,विनोद परदेशी यांची नावे आहेत