मनीष धूत यांच्या विरोधात स्टेट बॅंकआॅफ बॅंकेला फसवल्याचा गुन्हा

औरंगाबाद – फोक्सवॅगन कार चे डिलर यांच्या विरोधात दोन वर्षांपूर्वी स्टेट बॅंक आॅफ इंडीया या बॅंकेची फसवणूक झाल्याचा गुन्हा क्रांती चौक पोलिस ठाण्यात आज(शुक्र) दुपारी १ वा.दाखल झाला आहे.
मनीष धूत यांनी २६जुलै २०१९ रोजी मिटमिटा येथील मुश्ताक मोईन शेख यांच्या मदतीने स्टेट बॅंक आॅफ इंडीयाला फसवले अशी तक्रार बॅंकेच्या क्रांतीचौक शाखेचे मॅनेजर पंकजकुमार साहू (४७) यांनी पोलिसांना दिल्यानंतर वरील अजामिनपात्र गुन्हा दाखल झाला. आरोपी मुश्ताक शेख यांनी बॅंके कडून ९लाख ३७ हजार रु.चे कर्ज मंजूर करवून घेतले. पण प्रत्यक्षात ७लाख ४०हजारांची गाडी खरेदी करुन बॅंकेला फसवल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूल सूर्यतळ करत आहेत. या प्रकरणी मनीष धूत यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, बॅंक मॅनेजर पंकजकुमार साहू यांनीच या प्रकरणात घोळ केला आहे. याबाबत पोलिसांना प्रत्यक्ष भेटून आपण पुरावे सादर करु.