#CoronaLatestUpdate : अफवांपासून सावधान | जाणून घ्या ताजी माहिती…

#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य सरकारनेही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन केले नाही तर आठ दिवसानंतर कडक लाॅकडाऊनबाबत विचार करु असा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर काही दिवसांपासून, जुन्या पोस्ट व्हायरल होत असल्याने लॉकडाऊनसंदर्भात, शाळांसंदर्भात अफवा पसरत आहे. त्यामुळे तुम्हाला ही अनेक प्रश्न पडत असतील. जाणून घ्या महाराष्ट्रात कोणते नवे निर्णय घेण्यात आले आहेत.
* संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे का?
– नाही. काही शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार काही ठराविक वेळांसाठी जमावबंदी / संचारबंदी / लॉकडाऊन करण्यात आला आहे.
* राज्यात कुठे कुठे लॉकडाऊन आहे?
– अमरावती, अकोला, यवतमाळ
* मुंबईत / पुण्यात लॉकडाऊन आहे का?
– नाही
* मुंबई, पुण्यात येण्या-जाण्याला बंदी आहे?
– नाही
* राज्यात जिल्हाबंदी आहे का?
– नाही
* विनामास्क फिराल तर दंड आहे का?
– हो, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांनाही दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आले आहेत.
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था/ मुंबई लोकल सेवा बंद आहे का?
– नाही, मुंबई लोकल त्यांच्या नियमानुसार सर्वसामान्यांना ठराविक वेळेपुरती सेवा बंद आहे.
* लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यात काय काय निर्बंध आहेत?
– सिनेमागृह, व्यायाम शाळा , मनोरंजन ,उद्याने, नाट्यगृहे, व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील. मालवाहतुकीवर निर्बंध नाही, उद्योग, अत्यावश्यक सेवा सुरु आहेत.
* शाळा, महाविद्यालयं बंद आहेत का?
– मुंबई उपनगरात शाळा, महाविद्यालयं बंदच होते. पुणे, नागपूर, अमरावती, वर्ध्यात सुरु असलेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत.
– औरंगाबाद महापालिका परीक्षेत्रात येणार्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा 28 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या वर्ग पूर्णपणे बंद असतील. दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू असतील.
– उर्वरित जिल्ह्यात अद्याप तरी सुरु आहेत. स्थानिक प्रशासन आणि कुलगुरुंनी महाविद्यालयांबाबत निर्णय घ्याव्यात असे सांगण्यात आले आहे.
#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी