#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.

 

#CurrentNewsUpdate

6:00 PM | 22 FEB 2021 : अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने शनिवारी रात्री 8 वाजता पासून 36 तासांसाठी जिल्हात लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण संख्या ही आटोक्यात येत नसल्याने परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेल्याने अमरावती शहर मनपा हद्दीत आणि अचलपूर नगरपालिका हद्दीत आज रात्री 8 वाजतापासून आठवडाभरा पासून म्हणजे 1 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे आज रात्री 8 वाजतापासून लॉकडाऊनला सुरवात होत असल्याने आज अमरावती शहरातील सर्व बाजार पेठ, मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरु असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात गर्दी केली आहे. आज सकाळपासून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले आहे, यात कोरोना नियमांना हरताळ अमरावतीकरांनी पाळल्याचे भयाण दृश्य दिसले, त्यामुळे अमरावती जिल्हात 7 दिवसानंतर परत लॉकडाऊन वाढन्यात येणार का, कारण लोक अद्यापही कोरोना बाबद गंभीर नाहीत.

 

4:19 PM | 22 FEB 2021 : बुलढाणा जिल्ह्यातील पाच नगरपालिका क्षेत्रात म्हणजेच शहरी भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, बुलढाणा, खामगाव, मलकापूर, चिखली आणि देऊळगाव राजा ही नगरपालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी यांनी घोषित केली आहेत. यातील निर्बंध अतिशय कडक असणार आहेत. त्यात रात्रीची संचारबंदी, खाजगी वाहनांना फिरण्यास बंदी इत्यादी नियम असणार आहेत.

 

4:09 PM | 22 FEB 2021 : कोरोनाचे वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्रा प्रशासनाने रद्द करताना एकही भाविकाला पंढरपूर शहरात न येऊ देण्यासाठी त्रिस्तरीय नाकेबंदी सुरु केली आहे. भाविकांची वाहने परत पाठवण्यास सुरुवात झाली आहे. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर सोलापूर जिल्हा सीमेवर पहिली नाकाबंदी करण्यात आली असून दुसरी नाकाबंदी पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर लावण्यात आली आहे. या दोन्ही नाकाबंदी चुकवून आलेली वाहने पंढरपूर शहराच्या सीमेवर अडवून त्यांची तपासणी केली जात आहे आणि भाविकांची वाहने पुन्हा परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. जी वाहने केवळ कळस दर्शन घेऊन लगेच परत जाणार आहेत अशा भाविकांच्या मोबाईल नंबरची नोंद पोलीस ठेवत आहेत .

 

4:14 PM | 22 FEB 2021 : सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी असेल. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान रात्रीची संचारबंदी असली तरी जिल्ह्यातील शाळा सुरु राहणार आहेत. शाळांमध्ये तपासणी पथके पाहणी करणार आहेत.

 

3:42 PM | 22 FEB 2021 : मंत्रालयात पुन्हा कोरोनाचा विळखा पाहायला मिळत आहे. महसूल विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

3:46 PM  | 22 FEB 2021 : औरंगाबाद शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद महापालिका परीक्षेत्रात येणार्‍या सर्व खाजगी आणि सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या शाळेतील पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या वर्ग पूर्णपणे बंद असतील. दहावी आणि बारावीचे वर्ग मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू असतील. येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद असतील. याबरोबरच शहरात असणारे सर्व कोचिंग क्लासेस देखील आजपासून ते 28 तारखेपर्यंत बंद असतील. तसे परिपत्रक महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी काढले आहे.

 

11:45 AM  | 22 FEB 2021 : पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत, मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत चाचणीत अपयशी, काँग्रेस आमदारांचा सभात्याग

 

8:30 AM | 22 FEB 2021 : सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेच्या उद्या ऑनलाइन पद्धतीने महापौर, उपमहापौर निवड होणार आहेत. मात्र, भाजपचे सात नगरसेवक अजूनही भाजपच्या संपर्कात नाहीत. तर काँग्रेसचे नऊ नगरसेवक महापौरपदाच्या उमेदवारी वरून नाराज. नऊ नगरसेवकांकडून दबाव गट तयार करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आधी सत्तेचा फॉर्म्युला ठरवावा अशी मागणी केली आहे.

 

8:52 AM| 22 FEB 2021 : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा बंद झालेली कोविड सेंटर सुरू होणार, कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने आरोग्य व्यवस्था अलर्ट, कोविड सेंटर सुरू करण्याच्या पाहणीसाठी एका समितीची स्थापना

 

8:19 AM | 22 FEB 2021 : कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेची प्रतीक्षा संपली, आजपासून आठवड्यातून तीन दिवस मिळणार विमानसेवा, व्यापारी आणि व्यावसायिकांना या विमानसेवाचा मोठा फायदा होणार, विमानफेरीत 35 प्रवासी असून तिकीट दर 3600 असणार आहे

 

7:50 AM  | 22 FEB 2021: कोरोना संकटात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालयांना कोल्हापूर महापालिकेचा दणका, काल दिवसभरात कोल्हापूर शहरातील 27 मंगल कार्यालयांवर पालिकेची कारवाई, सोशल डिस्टनसिंग, 50 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित, सॅनिटायझर नसल्याचा ठपका, कारवाई करण्यात आलेल्या मंगल कार्यालयांकडून 35 हजाराचा दंड वसूल

शरद पवार यांचे 1 मार्च पर्यंत राज्यातील सार्व कार्यक्रम रद्द

शरद पवार यांचे 1 मार्च पर्यंत राज्यातील सार्व कार्यक्रम रद्द

पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकर ; कवी वरवरा राव यांना 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकर ; कवी वरवरा राव यांना 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर

AccidentNewsUpdate : देवगड फाट्याजवळ भीषण अपघात , जालना जिल्ह्यातील पाच तरुण ठार

AccidentNewsUpdate : देवगड फाट्याजवळ भीषण अपघात , जालना जिल्ह्यातील पाच तरुण ठार

 

Leave a Reply

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.