Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अरे रे !! काय हे !! डॉक्टरने स्वतःसहित संपवले अख्खे कुटुंब …

Spread the love

अहमदनगर ।  घरातील मोठ्या मुलाला ऐकू येत नाही म्हणून नैराश्य आल्याने एका डॉक्टरने आपली पत्नी आणि दोन मुलांना इंजेक्शनद्वारे औषध देत स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या करून आपले कुटुंब संपवल्याची धक्कादायक घटना  कर्जत तालुक्यातील राशीन येथे घडली आहे . या घटनेमुळे राशीन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , डॉ.  महेंद्र थोरात हे राशीनमधील प्रथितयश डॉक्टर आहेत . क्रिकेटचा छंद असलेल्या आपल्या १६ वर्षीय मुलाला ऐकू येत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले असून आपली संपत्ती कर्णबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या एखाद्या संस्थेला दान द्यावी, अशी इच्छाही डॉ. थोरात यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली आहे.

डॉ. महेंद्र थोरात, मोठा मुलगा कृष्णा (वय १६) व लहान मुलगा कैवल्य (वय ७) आणि पत्नी वर्ष हे सर्व जण मृतावस्थेत आढळून आले. डॉ . थोरात यांनी आधी तिघांना विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन थोरात यांनी गळफास लावून घेत स्वतःहीआत्महत्या केली. थोरात यांच्या घरात पोलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. या  चिठ्ठीत त्यांनी म्हटले आहे की, आम्ही आज आपल्यापासून कायमच निरोप घेत आहोत. कृष्णाला कानाने ऐकू येत नाही. त्यामुळे त्याचे समाजामध्ये अपराधीपणाने राहणे आता सहन होत नाही. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालो आहोत. कृष्णाचे कशातच मन लागत नाही. मात्र, तो कधी बोलून दाखवत नाही. मात्र, त्याचे हे दु:ख आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी संमतीने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल कोणाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जबाबादर धरण्यात येऊ नये. असे कृत्य करणे आम्हाला योग्य वाटत नाही, मात्र इलाज नाही, आम्हाला माफ करा, असेही चिठ्ठीत म्हटले आहे.

अधिक माहितीनुसार कृष्णा हा क्रिकेट खेळाडू होता. त्याला पुण्यातील एका क्रीडा संस्थेत शिक्षणासाठी पाठविले होते. त्याला ऐकू यावे, यासाठी बरेच उपचार केले. मात्र, त्यात यश येत नव्हते. त्याला श्रवणयंत्रही घेऊन देण्यात आले होते. त्याचाही उपयोग होत नव्हता. डॉ. थोरात राशीनजळच्या बारडगाव दगडी या गावाचे मूळ रहिवाशी आहेत. राशीनमध्ये येऊन त्यांनी हॉस्पिटल सुरू केले. एका मनमिळावू डॉक्टरने हे टोकाचे पाऊल उचलल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!