AurangabadCrimeUpdate : पेट्रोल पंपावरून डिझेल चोरी करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

९८ लाख ४९ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांची कारवाई
औरंंंगाबाद : पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटकेत असलेल्या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी चार ट्रक, डिझेल चोरी साठी लागणारे साहित्य, तीन हॅण्डपंप, आठ, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ९८ लाख ४९ हजार ४२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी शुक्रवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत दिली. अटकेत असलेल्या टोळीकडून ३६ गुन्हे उघडकीस आले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
रामा पन्या पवार (३०, रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी,जि.उस्मानाबाद) असे डिझेल चोरी करणा-या टोळी प्रमुखाचे नाव आहे. तर धनाजी महादेव पोळ (३५), रामा सूबराव काळे (३०), गुलाब उर्फ गुलच्या गणपु काळे (१९), दशरथ लक्ष्मण काळे (१९), उध्दव बापु शिंदे (२१), गणेश काळू पवार (२३), लक्ष्मण पन्या पवार (४०), विकास मचिंद्र काळे (२१), राजेंद्र शहाजी काळे (१९), नितीन बापु पवार, किरण अर्जुन काळे (सर्व रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद) ही रामा पवार याच्या साथीदाराची नावे आहेत. तर विनोद नानासाहेब बारकुले (वय२७) आणि रोहित दिलीप मोरे (वय २९, दोघे रा. येरमाळा ता. कळम जि. उस्मानाबाद) हे दोघे चोरीचे डिझेल खरेदी करण्यासाठी आलेल्यांची नावे आहेत. प्रदीप प्रल्हाद राठोड (वय ४०, रा.सिडको एन-३ परिसर, औरंगाबाद) यांच्या चित्तेगाव शिवारातील पेट्रोल पंपावरून १७ पेâब्रुवारीच्या रात्री ३ लाख ४५ हजार रूपये किमतीचे ३ हजार ४८० रूपये किंमतीचे डिझेल चोरी गेले होते. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणाचा तांत्रिक तपास करून स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, सहायक फौजदार सय्यद झिया, वसंत लटपटे, जमादार श्रीमंत भालेराव, धिरज जाधव, विक्रम देशमुख, नामदेव सिरसाठ, बालू पाथ्रिकर, किरण गोरे, प्रमोद खांडेभराड, संजय देवरे, शेख नदीम, वाल्मीकी निकम, संजय भोसले, राहूल पगारे, नरेंद्र खंदारे, योगेश तरमाळे, ज्ञानेश्वर मेटे, बाबासाहेब नवले, जीवन घोलप आदींच्या पथकाने राष्ट्री महामार्ग क्रमांक ५२ वरील नवीन टोलनाका व झाल्टा फाटा येथे सापळा रचून डिझेल चोरी करणा-या टोळीच्या आणि चोरीचे डिझेल खरेदीसाठी आलेल्यांच्या मुसक्या आवळल्या.
पथकाला ३५ हजाराचा रिवॉर्ड जाहीर
डिझेल चोरी करणा-या टोळीचा पदार्फाश करून टोळीला गजाआड करून ३६ गुन्हे उघडकीस आणणा-या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाला ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ३५ हजाराचा रिवॉर्ड जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी पहिल्यांदाच या टोळीला गजाआड करण्यात यश मिळविले असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.