Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : क्रौर्याची परिसीमा : पती खून करून पसार , आईच्या मृतदेहावर खेळात होते चिमुरडे

Spread the love

औरंगाबाद : नराधम पतीने पत्नीचा निर्घृण खून करून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात  सोमवारी पहाटे घडली आणि घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली. कविता सिद्धेश त्रिवेदी असे  32 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. या घटनेत मनाला चटका लावणारी गोष्ट म्हणजे आईच्या मृतदेहाजवळ दोन चिमुरड्यांना सोडून आरोपी पिता सिद्धेश गंगासागर त्रिवेदी घटनास्थळावरून पसार झाला.

औरंगाबाद शहरातील पिसादेवी भागातील या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून फरार निर्दयी पतीचा शोध जारी आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि यातच सिद्धेश याने आपल्या पत्नीवर रॉडने वार करण्यास सुरुवात केली. भांडणातील राग सिद्धेशच्या इतक्या डोक्यात गेला होता की नंतर त्याने दगडाने ठेचत पत्नी कविता हिचा जीव घेतला. हे सगळे  घडत असताना त्यांची दोन लहान मुलंही तिथंच होती. मात्र आपला जन्मदाता बापच आईच्या जीवावर उठला आहे, हे कळण्याइतकं त्यांचं वय नव्हतं. आईची हत्या करून बाप तिथून पळून गेला आणि नंतरही मुलं आईच्या मृतदेहाशेजारीच खेळत राहिली.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!