AurangabadCrimeUpdate : “लिव्ह ईन” मधे राहणार्या जोडप्याने एकाच प्लॉटचे केले दोनव्यवहार, एका खरेदीदाराला भोसकले, तीन अटक

औरंगाबाद । लिव्हइन मधे राहणार्या जोडप्याने एकच प्लॉटचे दोन वेगवेगळे व्यवहार केल्यामुळे प्रियकराने रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला सुपारी देत आज दुपारी १ वा.एकाला भोसकले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
राहूल नरवडे, अहमद पटेल आणि हुसेनदादा शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर ऋषीकेश भास्कर मोरे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. भास्कर मोरे यांनी विजयनगर परिसरात सखू म्हस्के या महिलेकडून प्लॉट ७ लाख ५०हजार रु.ना खरेदी केला.तर याच प्लाट चा व्यवहार सखूचा प्रियकर राहूल नरवडे याने हुसेनदादा खान या व्यापार्याशी करंत १ लाख ५०हजार रु. बयाना घेतला. राहूल नरवडे ला प्रेयसीने केलेला व्यवहार कळल्यानंतर त्याने हुसेन दादाखान ला प्लॉटवर सामान टाका असे सांगून कब्जा करंत असतांना भास्कर मोरे व त्यांची मुले ऋषीकेश आणि मळेश घटनास्थळी आले. त्यांनी हुसेनदादाखान यांना प्लाँटवर कब्जा करण्याचे कारण विचारताच राहूल नरवडे सोबत असलेला अहमद पटेल ने चाकूने मोरे कुटुंबियावर हल्ला केला. त्यात ऋषीकेश गंभीर जखमी झाला.पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय खटके करंत आहेत