अजित डोभाल दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर ; पाकिस्तानच्या कटाचा खळबळजनक खुलासा

Advertisements
Advertisements
Spread the love

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावरील हल्ल्यावर पाकिस्तान बारीक लक्ष ठेवून आहे.  जैशचा दहशतवादी हिदायतुल्लाने पाकिस्तानच्या कटाचा खळबळजनक खुलासा केला आहे. यासाठी पाकिस्तानने डोभाल यांच्या कार्यालयाची रेकी केली होती. दहशतवादी हिदायतुल्लाने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदचा हँडलरना या रेकीचे अनेक महत्त्वाचे व्हिडिओ पाठवले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिदायतुल्लाला अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने हा खुलासा केला आहे. हा खुलासा झाल्यानंतर अजित डोभाल यांच्या घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Advertisements

उरी सर्जिकल स्ट्राईकपासून अजित डोभाल हे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहे. त्यामुळे आता हे उघड झाले आहे की डोभाल यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने जैश दहशतवादी हिदायतुल्लाने रेकी केली होती. जम्मू काश्मीर पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी दहशतवादी संघटना लष्कर-ए-मुस्तफाच्या (एलईएम) हिदायतुल्लाह याला अटक केले होते. हिदायतुल्लाह जम्मूमध्ये एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होता. सुरक्षा दलांचा असा दावा आहे की हिदायतुल्लाहला पकडण्यासाठीचे ऑपरेशन यावर्षी जानेवारीमध्येच सुरू झाले होते. जम्मूमध्ये आपली दहशतवादी संघटना बळकट करण्यासाठी हिदायतुल्लाहने शहरातील भटिंडी भागात एक घर भाड्याने घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने कबूल केले की तो जम्मूमधील जैश-ए-मोहम्मदच्या ओजीडब्ल्यूचा वापर करून शहरात मोठा आत्मघाती हल्ला करण्याचा कट रचत होता.

Advertisements
Advertisements

18 जानेवारीला पोलिसांनी अनंतनाग येथील रहिवासी अयाज भट याला अटक केली होती. चौकशीत अयाजने त्याने अटक केलेले दोन साथीदार रईस मीर आणि शकीर इटू यांनाही हिदायतुल्लाहचे साथीदार म्हणूनही सांगितले. या सर्वांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या म्होरक्याला अटक केली. हिदायतुल्लाहकडून सुरक्षा दलाला दोन पिस्तूल आणि काही ग्रेनेडही सापडले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!