AurangabadCurrentNewsUpdate : पोलिसांच्या हातून फरार झालेला आरोपी पुन्हा अटकेत

औरंगाबाद । पोलिसांच्या हातून फरार झालेल्या आरोपीला मनमाड पोलिसांनी जेरबंद करून मुकुंदवाडी पोलिसांच्या हवाली केले आहे. सदर आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुरनं 31/2021 कलम 394,34 भादवि अन्वये गुन्हा दाखल आहे . दि.10फेब्रुवारी 2021 रोजी तो पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता . अमर भाऊसाहेब गायकवाड वय 21 वर्ष रा.वैशाली धाबा जाधववाडी औरंगाबाद असे या आरोपीचे नाव आहे . सदर फरार आरोपी आज दि.11 फेब्रुवारी रोजी मनमाड रेल्वे स्टेशन येथे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोउपनि म्हस्के व इतर पोलिसांच्या पथकाने मनमाड येथे जाऊन मनमाड रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले . सदर आरोपीची माहीती व फोटो मुकुंदवाडी पोलिसांनी मनमाड रेल्वे पोलिसांना पाठवले होते. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निऱिक्षक शरद इंगळे यांनी हि माहिती दिली आहे.