Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सिडको उड्डाणपुलावर टायर फुटल्याने उसाचा ट्रॅक्टर उलटला

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंगाबाद : उसाने भरलेली ट्रॉली घेवून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरचे समोरील चाक फुटल्याने उसाचा ट्रॅक्टर उलटला. हा अपघात बुधवारी (दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिडको उड्डाणपुलावर घडला. शहर वाहतूक शाखा पोलिसांनी वेळीच उड्डाणपुलावर धाव घेत वाहतूक पुलाखालून वळवली. त्यानंतर तासाभराने उलटलेला ट्रॅक्टर बाजूला करून उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत केली.

Advertisements

उसाने भरलेली ट्रॉली घेवून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच-२०-एएस-३८९०) हा सिडको उड्डाणपुलावरून चिकलठाण्याकडे जात होता. सिडको उड्डाणपुलावरून ट्रॅक्टर जात असतांना ट्रॅक्टरचे समोरील चाक अचानकरित्या फुटल्याने वेगात असणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली रस्त्यावरच उलटली. पुलावर उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्यामुळे काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून सिडको उड्डाणपुलावरील वाहतूक पुलाखालून वळवली. जवळपास तासाभराने पोलिसांनी उलटलेला ट्रॅक्टर बाजूला करून उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत केली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!