Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाच कोटीत हत्या करण्याची धमकी देणारा गजाआड

Spread the love

पाँडिचेरी : गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला होता. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या होत्या. तर पाँडिचेरीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी एका 43 वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्य़ाचा प्रस्ताव दिला होता. जर त्याला कोणी 5 कोटी रुपये देत असेल तर तो मोदींची हत्या करेल, असा प्रस्ताव त्याने पोस्ट केला. शुक्रवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

आर्यनकुप्पम गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला गुरुवारी अटक करण्यात आली. नंतर त्याला स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी रिअल इस्टेट एजंट आहे. त्याचे नाव सत्यानंदम आहे. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यानंदमने त्याच्या फेसबुक ब्लॉगवर एक मेसेज लिहिला होता. गुरुवारी हा मेसेज एका कार चालकाने पाहिला आणि पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी पाहिल्याने कार चालकाने लगेचच पोलिसांना याची माहिती दिली.

गेल्यावषी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला होता. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या होत्या. NIA ला मिळालेल्या या ईमेलमध्ये केवळ “Kill Narendra Modi” या ३ शब्दांचा वापर करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. हा ईमेल ८ ऑगस्ट रोजी मिळाला होता. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेला धोका असल्याचे  बोलले जात होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. या ईमेलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा आणखी कडक आणि वाढवण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!