Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#FarmerProtest : पोलिसांनी जिथे खिळे ठोकले तिथे फुले लावण्याचा निर्धार

Spread the love

गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपण फुले लावणार असून त्यासाठी आपण दोन ट्रक माती मागवली असल्याची माहिती शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर मोठे खिळे ठोकून आणि सिमेंटच्या भिंती उभारुन खबरदारी घेतली होती. पण पोलिसांची ही खबरदारी केंद्र सरकारच्या अंगाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, खिळे ठोकलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देश-विदेशातून मोदी सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यांवर ठोकलेले खिळे अखेर पोलिसांना काढावे लागले. पण आता या खिळे ठोकलेल्या जागेवरच फुले लावणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७४ वा दिवस आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचं सिंधू बॉर्डरवर असलेले केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनले आहे. या ठिकाणाहून अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे की, गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपणं फुले लावणार आहोत आणि त्यासाठी 2 ट्रक माती मागवल्याचेही त्यांनी सांगितले.

‘ग्रेटा थनबर्ग आणि रिहानाला ओळखत नाही’

ग्रेटा थनबर्ग आणि पॉपस्टार रिहाना यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत राकेश टिकैत यांनी केले आहे. पण आपण या दोघींनाही ओळखत नसल्याचे टिकैत यांनी सांगितले. हे आंतरराष्ट्रीय कलाकार कोण आहेत? त्यांनी आमचे समर्थन केले असले तरी मी त्यांना ओळखत नाही, असे टिकैत यांनी पत्रकारांना सांगितलं.

पोलिसांनी रस्त्यांवरील खिळे काढले

गाझीपूर बॉर्डरवर लावलेले खिळे काढतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, आम्ही सध्या रस्त्यांवरील खिळे काढत आहोत. पण जिथे गरज भासेल तिथे ते पुन्हा लावले जातील. तर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षाव्यवस्था जैसे थे राहील असे पोलिस उपायुक्त दीपक यादव म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!