महिला पोलिसाने जागेवर पाकिटमार पकडला.

औरंगाबाद -अपंग पाकिटमाराला महिला पोलिसाने जागेवरच पकडले. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अकबरखान रऊफखान पठाण(४५)रा.बायजीपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे.तर शाहिनखान शब्बीरखान (२९) असे फिर्यादीचे नाव आहे.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार फिर्यादी आज संध्याकाळी सिल्लोड येथे जाणार्या बस मधे हर्सूल टी पाँईंट वरुन साडेपाच च्या सुमारास चढंत होते. त्याच वेळेस आरोपी अकबरखान ने शाहिनखान यांचे साडेतीन हजार रु.असलेले पाकिट आरोपी अकबरखान याने मारले हा प्रकार हर्सूल पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी निता पवार यांनी पाहिला.दरम्यान शाहिनखान यांनाही ताबडतोब जाणिव होताच ते बसखाली उतरले म्हणून आरोपीने शाहिनखान यांना चोरलेले पाकिट परत दिले.त्यामुळे शाहिनखान यांनी अपंग आरोपी कडे पहात तक्रार देण्यास नकार दिला.पण अकबरखान हा अपंगत्वाचा फायदा घेत नेहमी पाकिटमारी करतो. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होणे महत्वाचे आहे.अशी भूमीका पोलिसांनी घेतली.पण गुन्हा दाखल झाला तर पाकिट आणि साडेतीन हजार रु.जप्त होतील. या भितीमुळे शाहिनखान टाळाटाळ करंत होते. शेवटी तेथे हजर असलेल्या एका नागरिकाने पाकिटात ४००रु. असल्याची फिर्याद शाहिनखान यांना देण्याचे सुचवले.म्हणून या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला.आरोपी अटक झाला.अन पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलिस करंत आहेत