महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत सॅनिटायझरची बॉटल उघडून ” त्यांनी ” तोंडाला लावली !!

मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत आपल्या खुर्चीवर बसले आणि सभेला सुरुवात होताच त्यांनी पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल उचलण्याऐवजी समोर असलेली सॅनिटायझरची बॉटल उघडून तोंडाला लावली नाही तोच मागे उभे असलेल्या सेवकाने त्यांना थांबवले त्यामुळे सॅनिटायझर पोटात जाण्यापासून वाचले. अनावधानाने त्यांनी पाण्याची बॉटल समजून चुकून सॅनिटायझरची बॉटल घेतली आणि ते प्यायले. सहआयुक्त रमेश पवार यांच्याकडून ही चूक होताच क्षणार्धातच सदर ठिकाणी एकच तारांबळ उडाली.
‘एएनआय’ने या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये पवार सॅनिटायझर प्यायल्याचे दिसत आहे. ही बाब लक्षात येताच तिथे तातडीने त्यांना थाबंवत त्यानंतर पाणीही देण्यात आले. या घटनेनंतर पवार काही काळासाठी त्या ठिकाणहून बाहेर निघून गेल्याचेही म्हटले गेले. काही कालावधीनंतर ते सभागृहात पुन्हा परतले आणि त्यांनी नियोजितय कार्यक्रम पूर्णत्वास नेला. त्याना कोणत्याही प्रकारचा त्रास न जाणवल्याची माहिती सध्या समोर येत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.