पोलिसआयुक्तालयाच्या पत्रांना विविध विभागाची केराचीटोपली

औरंगाबाद – पोलिस आयुक्तालयाच्या पत्रांना महापालिका, सार्वजनिक बांधका विभाग,राष्र्टीय महामार्ग प्राधिकरण, जागतिक बँंक शाखा कार्यालय केराची टोपली दाखवतात असा गौप्यस्फोट पोलिसआयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी केला.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळित राहण्याकरता शहर वाहतूक शाखेसोबतंच महावितरण, महापालिका, सार्वनिक बांधकाम विभाग राष्र्टीय महामार्ग प्राधिकरण, जागतिक बँंक निधी वितरण विभाग यांचे सहकार्य हवे असते. पण वरिल विभाग बेजबाबदारपणे वागूनशहरातील वाहतूक व्यवस्था अडचणीत आणतात. परिणामी अपघातामधे मृत्यू पावणार्यांचे प्रमाण वाढते असा आरोपही वरिष्ठ अधिकार्यांनी केला. शहरातील वाहतूक व्यवस्थासुरळित राहावी यासाठी महिन्यातून तीन चार वेळेस वरिल विभागांकडे पोलिसआयुक्तालय पत्रव्यवहार करते.रस्त्यातील विद्यूतखांब, रस्तारुंदीकरणादरम्यान होणारे अडथळे यासाठी राष्र्टीय महामार्ग प्राधिकरण, महिवितरण महापालिका व इतर विभांगाना पत्रव्यवहार करावा लागणे हेच मुळात दुर्देवी आहे. वाहतूक पोलिसांनीच जबाबदारीची जाणिव ठेवावी व इतरांनी नाही. हे अत्यंत खेदजनक असल्याचा आरोप सूत्रांनी केला. यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने आस्तिककुमार पांडे, कार्यकारी अभियंता भगंत, महामार्ग विभागाचे गाडेकर, जागतिक बँंक विभाग प्रमुख भांडे यांच्याशी संपर्क केला असता वरिल अधिकार्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही.