Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#UnionBudgetSession2021 : केंद्रीय कृषी कायद्यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून कौतूक 

Advertisements
Advertisements
Spread the love

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (२९ जानेवारी) सुरूवात झाली. दरम्यान आजच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. त्यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार ते अगदी कोरोना संकट अशा विविध मुद्यावर चर्चा केली. कोरोनाच्या संकटकाळात सरकारने तातडीने उचललेल्या पावलांमुळे अनेकांचे जीव वाचवण्यास मदत झाली असे देखील त्यांनी आजच्या अभिभाषणात नमूद करत मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

Advertisements

देशात सध्या कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाची चर्चा आहे. त्याची झलक आजच्या अभिभाषणात दिसली. रामनाथ कोविंद यांनी आज त्याबद्दल माहिती देताना नीट चर्चेनंतर संसदेत सात महिन्यांपूर्वी नवे 3 कृषी कायदे पारीत करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा कोट्यावधी लहान मोठ्या शेतकऱ्यांना मिळायला सुरूवात झाली. लहान शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला होता. मात्र आता यावर कोर्टाने स्थगिती दिली आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. पण नव्या कायद्यांमुळे जुन्या सुविधा आणि अधिकारांना धक्का लावला जाणार नाही असे म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाच आदर करते पण प्रजासत्ताक दिनी झालेल्या लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा निषेध करत असल्याचेही म्हणाले. भारताच्या तिरंग्याचा अशाप्रकारे अपमान होने ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. तसेच कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतामध्ये आता कोरोनाच्या संकटावर आपण नियंत्रण मिळवत आहोत याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सरकारने वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत झाल्याचेही त्यांनी म्हणाले. तसेच देशात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या कोरोन लसीकरणाचेही त्यांनी कौतुक केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!