दुचाकी चोरीला जाऊ नये यासाठी मेकानिक असोसिएशनने केले नवीन तंत्र विकसीत

औरंगाबाद – दुचाकी चोरीला आळा बसावा यासाठी ग्राहकांच्या वाहनांत काही तांत्रिक बदल करुन देण्याचे एक नवीनच तंत्र जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनने विकसीत केले असून वाहनांमध्ये ही यंत्रणा बसवून देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ नुकताच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, पोलीस निरिक्षक अघाव आदिंच्या उपस्थितीत करण्यात आला.
टूव्हिलर मेकानिक संघटना गाडीमध्ये काही तांत्रिक बाबी हाताळते त्याची वाहन मालक व मेकॅनिक त्या बाबीची माहिती असते अशा पद्धतीची एक कार्यप्रणाली गाडीमध्ये विकसित केली जाते तसेच मेन स्टँडला लॉक केल्यानंतर ती गाडी स्टॅन्ड वरून खालीही येत नाही. याबाबतची माहिती सर्वांना व्हावी या हेतूने एक स्टॉल लाऊन त्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.
यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस उपायुक्त मिना मकवाना, पोलीस निरिक्षक अविनाश आघाव, अमोल देशमुख, इंगळे आदि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ऑटोमोबाइल व टायर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कावळे, आदिंची उपस्थिती होती. संघटनेतर्फे या सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.