MaharashtraNewsUpdate : आई विना पोरक्या झालेल्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण करणारा पिता गजाआड

आईविना पोरक्या झालेल्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पित्याला इगतपुरी पोलिसांनी गजाआड आलेले आहे. विशेष म्हणजे हा अत्याचारी बाप रेल्वे पोलिसामध्ये कार्यरत आहे. राहुल विजय मोरे असं त्याचं नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी मुलांना सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केलं आहे. मुलांना प्रचंड मारहाण झाली असून, ते घाबरले असल्याचं जवळच्या नातेवाईकानी सांगितलं. या प्रकरणी राहुल मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी अधिक माहिती अशी कि , जन्मदात्या बापाचा अत्याचार सहन करणाऱ्या या मुलांच्या आईचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. आईच्या पाठोपाठ या मुलांना जीव लावणाऱ्या आजीचेही निधन झाले. त्यामुळे या लहान बहीण – भावाकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नव्हतं. दरम्यान मुलांची जबाबदारी खांद्यांवर पडलेल्या बापानं दुसरं लग्न केलं मात्र त्यानंतर दिवसेंदिवस मुलांचे हाल वाढत गेले. पोलीस बापाकडून मुलांना जबर मारहाण सुरू झाली. आज तर या नराधम बापाने हद्द केली. मुलांना बेल्टने, काठीने व हाताने जबर मारहाण केली.
दरम्यान पित्याच्या या क्रुरकृत्याची खबर इगतपुरी पोलिसांना मिळाली. इगतपुरी पोलिसांनी मुलांच्या मामा निलेश कंदारकर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. ‘तुमच्या पाव्हण्याने मुलांना अमानुष मारहाण केली. मुलांना घेऊन जा नाहीतर तो मारुन टाकेन’ असं सांगितलं. त्यानंतर निलेश यांनी तातडीने इगतपुरीला दाखल झाले. त्यानंतर राहुल मोरे याला फोन करून मुलांना पोलीस स्टेशनला घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मुलांना अमानुष मारहाण झाल्याचे समोर आले. निलेश यांनी तक्रार दाखल केल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी राहुल मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ताब्यात घेतले आहे. मुलांना झालेली मारहाण पाहून पोलीस सुद्धा हैराण झाले होते. मुलांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे.