पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लसीकरण केल्यानंतर… मी लस घेईल – प्रकाश आंबेडकर

संपूर्ण देशात कोरोनावर मात करण्यासाठी कोव्हिडशील्ड आणि कोव्हॅक्सीन या लासिकरणाला सुरवात झाली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही लस आधी घ्यावी, त्यानंतर मी लस घेईल, असे वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद शहरात आज पत्रकार परिषद घेतली. दम्यान, ‘केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायदे विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शाहीन बाग सारखे किसान बाग आंदोलन येत्या 27 जानेवारी रोजी राज्यभर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
कोरोनाची लस आपण घेणार आहात का? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आधी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतर मी लस घेईल’ अशी भूमिकाच आंबेडकर यांनी मांडली तसेच, औरंगाबादच्या नामांतरावरून सुरू असलेल्या वादाबाबत त्यांनी औरंगाबादकर जनतेचे मतदान घ्यावे, अशी मागणी केली. ‘समाजातील गरीब मराठा समाज, जोपर्यंत बंड करणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही’, असे देखील ते म्हणाले.