पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणीचा विनयभंग

औरंंगाबाद : पोलिस भरतीची तयारी करीत असलेल्या तक्रारदार तरूणीला शिवीगाळ करून चार जणांनी तिचा विनयभंग केला. ही घटना गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. पीडित तरूणी व तिच्यासोबतच्या दोन मैत्रिणी पोलिस भरतीची तयारी करीत आहेत. गुरूवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मैदाणी सराव केल्यावर तिघीही आपल्या खोलीकडे परत जात असतांना दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी पीडितेस धडक दिली. यावेळी पीडितेने धडक का दिली असे विचारले असता शिवराणा अकॅडमीचे संचालक सचिन राजपूत, त्यांचा लहान भाऊ आणि दोन साथीदारांनी पीडितेस शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. तसेच पीडितेला आणि तिच्या मैत्रिणींना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शिवराणा अकॅडमीचे संचालक सचिन राजपूत, राजपूत यांचा लहान भाऊ व अन्य दोघांविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.