Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्लीतील कार्यालयात आयकर विभागाची टीम…

Robert Vadra, center, son-in-law of Congress party leader Sonia Gandhi arrives to appear before the Enforcement Directorate in New Delhi, India, Wednesday, Feb. 6, 2019. (AP Photo)

Spread the love

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्लीतील कार्यालयात आयकर विभागाची एक टीम दाखल झाली आहे. बेहिशोबी संपत्ती प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब नोंदवण्यासाठी ही टीम इथे दाखल झाली असल्याचे वृत्त आहे.

आयकर विभागाने यापूर्वीही रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना समन्स बजावले होते परंतु, करोना संक्रमणाचे कारण देत रॉबर्ट वाड्रा यांनी जबाब नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली होती. बीकानेर आणि फरीदाबाद जमीन घोटाळा प्रकरणात आयकर विभागाची टीम रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करत आहे.

आयकर विभागाशिवाय रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लंडनस्थित संपत्ती खरेदी करण्यासाठी रॉबर्ट वाड्रा यांच्यावर मनी लॉन्ड्रींगचे आरोप करण्यात आले आहेत. वाड्रा यांनी ब्रायनस्टन स्क्वेअरमध्ये १.९ मिलियन पाऊंड किंमत असणारी मालमत्ता मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून खरेदी करण्याचा आरोप आहे. रॉबर्ट वाड्रा यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

प्रसार माध्यमातील झी समूहाच्या मुंबईतील कार्यालयांवर आयकर विभागाने सोमवारी धाडी टाकल्या आहेत. कर चुकवेगिरीच्या संशयावरुन झी समूहाशी संबंधित जवळपास १५ ठिकाणी आयकर विभागाकडून तपास मोहीम सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘झी’च्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या पथकाने सुरु केली तपासणी

आज सकाळी मुंबईतील लोअर परळ आणि वरळी येथील ‘झी’च्या कार्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरु केली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. झी समूहाने जीएसटी कर चुकवल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे. बनावट बिलांच्या आधारे जीएसटी कर बुडवल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान आयकर विभागाच्या या कारवाईबाबत झी समूहाने स्पष्टीकरण दिले आहे. ही धाड नसून सर्व्हे आहे तसेच आयकर अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचे झी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्योजक सुभाष चंद्रा झी समूहाचे प्रमुख आहेत. जवळपास १९० बाजारपेठांमध्ये झी समूहाच्या सेवा सुरु आहेत. सहा महिन्यापूर्वीच राहुल जोहरी यांच्याकडे झी समूहाच्या फेररचनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. माध्यम क्षेत्रातील सवार्त फायदेशीर आणि यशस्वी कंपनी करण्यासाठी मागील सहा महिन्यांमध्ये कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनात मोठे फेरबदल करण्यात आले. विशेषतः डिजिटलमधील संधी आणि नव्या क्षेत्रात विस्तार केला जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!