AurangabadCrimeUpdate : पुन्हा पोलिसाला मारहाण करंत लूटले, दोघे अटक, एक फरार

औरंगाबाद- नवीन वर्षाचा बंदोबस्त करुन घराकडे परतणार्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्याला अदालतरोडवर शुक्रवारी पहाटे २वा. मारहाण करंत लूटले या प्रकरणी वेदांतनगर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.व दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिपक वक्ते आणि नितीन वक्ते अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर गौतम राम कदम हा फरार आहे. या प्रकरणात दिपक वक्तेला पुंडलिकनगर पोलिसांनी पकडले तर नितीन वक्ते ला वेदांत नगर पोलिसांनी पकडले
पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रवीण मुळे (३५) रा. नंदनवनकाॅलनी हे कामकाज आटोपून आज पहाटे दीड वा. घरी जात असतांना आरोपी दिपकआणि नितीन वक्ते व गौतम कदम यांनी स्कूटीवर येत प्रवीण मुळेंना अडवून मारहाण केली व त्यांच्या कडील १४६० रु. हिसकावले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतनगर पोलिस करंत आहेत