Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneCrimeUpdate : धक्कादायक : मैत्रीच्या बहाण्याने मैत्रिणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Advertisements
Advertisements
Spread the love

मैत्रीचा गैरफायदा घेत माझ्यासोबत गाडीत बस नाही तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन , असे धमकावत पोलिसांची मुलगी आलेल्या मुलीचे अपहरण करून तिच्यवा सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  पोलीस कर्मचाऱ्याच्या  या मुलीचं आरोपींनी २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता वडगाव शेरी परिसरातून अपहरण  करून तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन सामूहिक बलात्कार करण्यात आला. हा सर्व प्रकार तरुणीने घरी सांगितल्यानंतर  पोलिसांत आरोपींविरोधात फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. २१ डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास तरुणी रस्त्याने एकटी जात होती. त्यावेळी सागर दोन साथीदारांसह गाडीतून तिथे आला. त्याने तरुणीला अडवले आणि “मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बस. गाडीत बसली नाही, तर मी जिवाचे बरेवाईट करून घेईन,”  असे म्हणाला. त्यानंतर त्याने विषारी द्रव्याची बाटलीही त्याने तरुणीला दाखवली. त्यामुळे घाबरून तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर तिघांनी तरुणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं व हातपाय बांधून नेवासा (अहमदनगर) परिसरात घेऊन गेले. तिथेच तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा पुण्यामध्ये आणून सोडलं.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!