AurangabadCrimeUpdate : पोलिस उपनिरीक्षकास चिरडण्याचा प्रयत्न

औरंंंगाबाद : नाकाबंदी मोहिमेदरम्यान कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकास कारचालकाने कार खाली चिरडण्याचा प्रयत्न केला. ही घटना २१ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उध्दवराव पाटील चौकात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनंता पांडूरंग तांगडे (वय ३२, रा.मिल कॉर्नर परिसर) हे आपल्या पथकासह २१ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उध्दवराव पाटील चौकात नाकाबंदी मोहिम राबवत होते. त्यावेळी भरधाव वेगाने जाणा-या कार क्रमांक (एमएच-२०ईपी-६९७९) ला पोलिस उपनिरीक्षक तांगडे यांनी थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी कारचालकाने तांगडे यांच्यासह पथकाला न जुमानता तांगडे यांच्या अंगावर भरधाव कार घालून कारसह पळून गेला. यावेळी उपनिरीक्षक तांगडे व कर्मचारी रस्त्याच्या बाजूला झालेल्या बालंबाल बचावले. याप्रकरण्ीा उपनिरीक्षक अनंता तांगडे यांच्या तक्रारीवरून कारचालकाविरूध्द मोटार वाहन कायद्यान्वये सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.