MaharashtraNewsupdate : हर्षवर्धन जाधव यांचा जमीन अर्ज फेटाळला

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुन्हा एकदा सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात बचाव पक्षातून अर्ज केला जाणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १५ डिसेंबरला पुण्यात अटक करण्यात आली आहे. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघांविरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती. आता न्यायालयाने या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला.