Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात ३ हजार ९४० नवीन रुग्णांचे निदान तर ३ हजार ११९ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात   ३ हजार ९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ३ हजार ११९ रुग्ण बरे होऊन घसरी परतले आहेत तर  ७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे . राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख ८१ हजार ८४१ करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९४.१४ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची ( अॅक्टिव्ह रुग्ण ) संख्या सध्या ६१ हजार ९५ इतकी आहे.

 

राज्यात आज ७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात या आजाराने एकूण ४८ हजार ६४८ जणांचा बळी घेतला असून सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २० लाख ५९ हजार २३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ९२ हजार ७०७ (१५.७ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३६० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार २० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!