Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शिक्षण संस्थेची फसवणूक, निवृत्त शिक्षण उपसंचालक पोलीस कोठडीत

Spread the love

औरंंंगाबाद : शिक्षण संस्थेतील अंतर्गत वादाचा फायदा घेत स्वयंघोषीत संस्था अध्यक्षाच्या मदतीने बनावट कागदपत्राच्या सहाय्याने शिक्षण संस्थेची फसवणूक करणा-या निवृत्त शिक्षण उपसंचालकास वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. प्रल्हाद बाबूराव चव्हाण (वय ६५, रा.सिडको एन-४) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या निवृत्त शिक्षण उपसंचालकाचे नाव असून त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला मोटे यांनी शुक्रवारी (दि.१८) दिले.

तक्रारदार मनोज श्रीधरराव मुळे (वय ४७, रा.मोहनीराज, सावरकर चौक, फुलंब्री , ह.मु. मनोरमा पार्क , सिडको एन-११) हे फुलंब्री  येथील प्रबोधन बहुउद्दशिय संस्थेचे सचिव आहेत. प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने भारत माता विद्यालय ही माध्यमिक शाळा चालविण्यात येते. दरम्यान, संस्थेत असलेल्या अंतर्गत वादाचा फायदा घेत प्रबोधन बहुउद्देशिय संस्थेचे स्वयंघोषीत अध्यक्ष पदमाकर विनायक इंगळे (वय ५७, रा.रायगडनगर, सिडको एन-९) यांनी विश्वस्तांच्या संमतीशिवाय बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने प्रस्ताव तयार करून सविता उत्तमराव नंदावणे यांची शाळेवर सहशिक्षीका म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी शिक्षण उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या प्रल्हाद चव्हाण यांनी या प्रस्तावास मंजूरी दिली होती. याप्रकरणी मनोज मुळे यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर.टी.भदरगे करीत आहेत.

विवाहितेस विष पाजणारा गजाआड, न्यायालयीन कोठडीत रवानगी

औरंंंगाबाद : शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेस पूर्ववैमनस्यातून विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाNया बंडू भानुदास भास्कर (वय २९, रा.फतियाबाद, ता.गंगापुर) याला गुरूवारी सायंकाळी दौलताबाद पोलिसांनी गजाआड केले.त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायाधीश एए काळे यांनी शुक्रवारी (दि.१८) दिले.
तक्रारदार कोमल नारायण सोनवणे (वय २१, रा.फतियाबाद, ता.गंगापूर) ही महिला आपल्या शेतातील कापूस वेचण्यासाठी १६ ऑक्टोबर २०२० रोजी गेली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास ती चक्कर मारीत असतांना शेताच्या बांधावरील एक सिमेंटचा खांब खाली पडला असल्याचे तिला दिसला. तीने खांबाजवळ उभ्या असलेल्या बंडू भास्कर याला विचारले असता, त्याने मीच खांब पाडला असल्याचे सांगत तक्रारदार कोमल सोनवणे यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. दरम्यान, कोमल सोनवणे यांच्या सासू ममताबाई सोनवणे या मध्यस्थी करीत असतांना बंडू भास्कर याने त्यांना देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर आपल्या साथीदारांना बोलावून घेत कोमल सोनवणे यांना शेतात ओढत नेऊन त्यांना विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्त्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

औरंंंगाबाद : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी एका महिलेचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी (दि.१८) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास उस्मानपुरा परिसरातील ज्योतीनगर भागात घडली.

शोभा विजय नेमाडे (वय ५८, रा.ज्योतीनगर, उस्मानपुरा परिसर) या शुक्रवारी दुपारी घराजवळील कुत्र्याच्या पिल्लांना पोळी देण्यासाठी बाहेर आल्या होत्या. दरम्यान त्या बंगल्याच्या गेटजवळ पडलेला कचरा गोळा करत असतांना दुचाकीवर आलेल्या न दोन जणांपैकी एकाने त्यांच्या हातात चिठ्ठी देवून पत्ता विचारला. शोभा नेमाडे या कागदावरील चिठ्ठी पाहण्यात व्यस्त असतांना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील जवळपास ६० हजार रूपये किमतीचे  अडीच तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. नेमाडे या आरडा-ओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!