Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : संसदेचे अधिवेशन रद्द केल्यामुळे काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

Spread the love

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन  रद्द केल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज दिली. दिल्लीत कोरोनाचा प्रसार वाढतो आहे त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करण्यात आली नसल्याचे सांगत काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे अशाच घटना होत असतील तर लोकशाही टीकणार कशी असा सवाल काँग्रेसने केला आहे.

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात सांगितेले आहे. तर, “करोना काळात NEET/JEE व IAS साऱख्या परीक्षा शक्य आहेत. शाळांमध्ये वर्ग, विद्यापीठांमध्ये परीक्षा शक्य आहेत. बिहार-बंगालमध्ये निवडणूकीच्या प्रचार सभा शक्य आहेत. मग संसदेचे हिवाळी अधिवेश का नाही? जर संसदेत जनतेचे मुद्देच मांडले जाणार नाही तर लोकाशाहीचा अर्थ काय राहील?” असा प्रश्न सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींना विचारला आहे.

दरम्यान काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन जोरदार आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!