AurangabadCrimeUpdate : इलेक्र्टीशियनचे घर फोडले १२तोळे सोने व २५ हजार रु.रोकड लंपास

औरंगाबाद -गावी गेलेल्या इलेक्र्टीशियनचे घरफोडून ४लाख ५९ हजारांचा मुद्देमाल व सी.सी. टि.व्ही. कॅमेर्याचा डीव्हीआर चोरुन नेला या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष लक्ष्मण जाधव (४३) रा. पिसादेवी रोड राजे संभाजी काॅलनी हर्सूल धंदा इलेक्र्टीशियन असे फिर्यादीचे नाव आहे. १३डिसेंबर रोजी फुलंब्री तालुक्यातील स्वजूळ बिल्डा या गावी फिर्यादी घराला कुलुप लावून गेले होते. आज सकाळी ८ वा. फिर्यादी जाधव यांचे शेजारी म्हस्के यांनी घरफोडी झाल्याचे जाधव यांना सांगितले.जाधव यांनी त्वरीत घरी येऊन पाहिले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले ोते व घरातील कपाट फोडून १२तोळे सोने व २५हजार रु रोख चोरुन नेले.जातांना चोरट्यांनी सी.सी. टि.व्ही.साठी लागणारा डीव्हीआर ही गायब केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ठोकळ करंत आहेत.