Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी आरपीआय डेमोक्रॅटिकची निदर्शने

Advertisements
Advertisements
Spread the love

केंद्र सरकारने केलेले नवीन कृषी कायदे रद्द करा,  डॉ. आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकर सुरु करा, मतपत्रिकेवर मतदान, भारतीय संविधानचा शालेय अभ्यासक्रमात समावेश, कोळीवाड्याच्या नागरिकांना मालकीहक्क देण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी आरपीआय डेमोक्रॅटीक या पक्षाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर पक्षनेते कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.

Advertisements

दादर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम जलद गतीने सुरु करण्यात यावे, आगामी निवडणूक एव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावे केंद्राद्वारे संमत करण्यात आलेले जाचक शेतकरी विधेयक त्वरित रद्द करावे, २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा संविधानाचा शालेय माध्यमिक अभयसक्रमात समावेश करण्यात यावा. अंधेरी एमआयडीसी एसआरए प्रकल्पातील भ्रष्ट्राचारासाठी समिती नियुक्त करावी, आरे वसाहतीतील झोपडीवासीयांना वीज, पाणी व इतर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, कोळीवाड्यांना जमिनीवर मालकीहक्क मिळावा, नवी मुंबइ विमानतळावर वाघिवळीवाडा लेणीचे पुनर्वसन करावे, गावांना पुनर्वसन करून गावकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा. या व अन्य मागण्या पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आल्या.

Advertisements
Advertisements

या निदर्शनात पक्षप्रमुख कनिष्क कांबळे,  राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व कार्याध्यक्ष कॅ. श्रावण गायकवाड, उपाध्यक्ष वसंत कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ कांबळे, विजय चव्हाण प्रभू बनसोडे, आकाश रावते, प्रकाश रणदिवे, इम्रान खान  या प्रमुख पदाधिकऱ्यासह महिला व शेकडो कार्यकर्ते  उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!