काबरानगर जुगार अड्यावर १ लाख २ हजाराचा मुद्देमाल जप्त

गारखेडा परिसरातील काबरानगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री कारवाई करीत जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी सहा जुगार्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण १ लाख २ हजार ६५० रूपये किमतीचा मुदृेमाल जप्त केला असल्याची माहिती विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे यांनी गुरूवारी (दि.१०) कळविली आहे.
आनंदलाला जाधव (वय ३४, रा.इंदिरानगर), संतोष एकनाथ बनसोडे (वय ३४, रा.जवाहर कॉलनी), प्रविण सुर्यभान बनसोडे (वय ३४, रा.पुंडलिकनगर), विनोद सुधाकर कापुरे (वय ४०, रा.पदमपुरा), सलमान खान मोहम्म्द खान (वय २७, रा.काबरानगर), जावेद खान मोहम्म्द खान (रा.औंरंगाबाद) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जुगार्यांची नावे आहेत. गारखेडा परिसरातील काबरा नगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली होती. विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे, पोलिस अंमलदार सय्यद शकील, अनिल खरात, मनोज विखनकर, विठ्ठल आडे, विजय निकम, विनोद पवार आदींच्या पथकाने बुधवारी रात्री काबरानगरातील जुगार अड्डयावर छापा मारून पत्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणार्या जुगार्यांना पकडले. दरम्यान या जुगार्यांविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे