MumbaiNewsUpdate : अर्णब गोस्वामी पुन्हा मुंबई हाय कोर्टात, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी १७ डिसेंबर ही तारीख दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ६५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली आहे. आरोपपत्राची दखल घेऊ नये असे निर्देश अलिबाग कोर्टाला द्यावेत अशी विनंती अर्जाद्वारे अर्णब गोस्वामी यांनी केली आहे.