MumbaiNewsUpdate : खा . संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना हृदयासंबंधी त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्या त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी होणार आहे. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मैथ्यू त्यांच्यावर उपचार करणार आहेत. हृदयासंबंधी पुन्हा त्रास होऊ लागल्याने वर्षभरात राऊत यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार, आज (बुधवार) राऊत लीलावती रुग्णालयात अॅडमिट झाले आहेत. त्यानंतर उद्या त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये बैठक झाली होती, या बैठकीला राऊत हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस असल्याचे निष्पण्ण झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर पहिल्यांदा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला होता.