Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : दिवसभरात ५,६०० नव्या करोनाबाधितांची नोंद तर १११ रुग्णांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यात दिवसभरात ५,६०० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५,०२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिवसभरात ५,६०० करोनाबाधितांच्या नोंदीमुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या १८,३२,१७६ एवढी झाली आहे. तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १६,९५,२०८वर पोहोचली आहे. तर आजवर ४७,३५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.५८ टक्के इतका आहे. तर  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  आता ९२.५२ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९ लाख ८९ हजार ४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ३२ हजार १७६ (१६.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ७९१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६ हजार ७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!