MaharashtraCoronaUpdate : दिवसभरात ५,६०० नव्या करोनाबाधितांची नोंद तर १११ रुग्णांचा मृत्यू

Today,newly 5600 patients have been tested as positive in the state. Also newly 5027 patients have been cured today. Totally 1695208 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 88537. The patient recovery rate in the state is 92.52%.
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 2, 2020
राज्यात दिवसभरात ५,६०० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५,०२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिवसभरात ५,६०० करोनाबाधितांच्या नोंदीमुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या १८,३२,१७६ एवढी झाली आहे. तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १६,९५,२०८वर पोहोचली आहे. तर आजवर ४७,३५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.५८ टक्के इतका आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.५२ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९ लाख ८९ हजार ४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ३२ हजार १७६ (१६.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ७९१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६ हजार ७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra recorded 5,600 new coronavirus cases, 5,027 recoveries, and 111 deaths in the last 24 hours, according to State Health Department
Total cases: 18,32,176
Total recoveries: 16,95,208
Active cases: 88,537
Death toll: 47,357 pic.twitter.com/R9FCpigC3w
— ANI (@ANI) December 2, 2020