Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : मुंबई विमानतळावर १८ कोटींचे कोकेन जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय विभागाने पश्चिम अफ्रिकेच्या ड्रग्ज तस्कराकडून १८ कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. डीआरआय विभागाची मागील दहा दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन २ किलो ९३५ ग्रॅम आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त आहे. या ड्रग्ज तस्कराला ८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १८ कोटी रुपये आहे. पश्चिम अफ्रिकेतील गिनी येथील रहिवासी असलेल्या ड्रग्ज तस्कराला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!