MumbaiNewsUpdate : कोरोनाला प्रत्यक्षातही ” गो कोरोना गो म्हणत , रिपाइं नेते रामदास आठवले कोरोनमुक्त

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनीही करोनावर मात केली असून, त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. उद्या रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ते रुग्णालयातून आपल्या निवासस्थानी परतणार आहेत. रामदास आठवले यांनी करोनावर मात केल्याबद्दल रिपाइं कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करून, त्यांचे अभिनंदन व स्वागत करणार असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.
देशात करोनाने शिरकाव केल्यानंतर २० फेब्रुवारी रोजी रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना’ चा नारा दिला होता. मात्र गो कोरोनाचा नारा देणाऱ्या…रामदास आठवले यांनाच करोनाने गाठले होते. दि. २७ ऑक्टोबर रोजी त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेंव्हा पासून ते खासगी रुग्णालयात दाखल होते. ११ दिवस उपचार घेतल्यानंतर घेत रामदास आठवले यांनी करोनावर मात केली आहे. उद्या ते बांद्रा येथील ‘संविधान’ या त्यांच्या निवासस्थानी परतणार आहेत.