AurangabadCoronaUpdate : जिल्ह्यात 39200 कोरोनामुक्त, 712 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 87 जणांना (मनपा 47, ग्रामीण 40) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 39200 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 82 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41015 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1103 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 712 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (55)
अंबिका नगर (1), जाधववाडी (1), बाळापूर फाटा (1), आदर्श महिला बँक परिसर, एमजीएम जवळ (1), एन चार सिडको (2), शिवाजी नगर (1), हरिओम नगर (1), सुराणा नगर (1), रचनाकर कॉलनी (1), टाऊन सेंटर (1), एन वन सिडको (3), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (1), लीला रेसिडन्सी, उल्कानगरी (1), मयूर नगर (2), देवळाई बीड बायपास (1), कांचनवाडी (1), स्टेशन रोड परिसर (1) पैठण रोड (1), बीड बायपास (2), एन पाच सिडको (1), एन दोन सिडको (1), अन्य (29)
ग्रामीण (27)
सिल्लोड (1), बिडकीन (1), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (2), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (4), मयूर पार्क, एकता सो., कचनेर (1), जायकवाडी परिसर , पैठण (1), भिवधानोरा, गंगापूर (1), उपजिल्हा रुग्णालय गंगापूर (2), बजाज नगर (4), वैजापूर (1), लाडगाव, वैजापूर (1), घायगाव, वैजापूर (3), अन्य (5)
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील 59 वर्षीय पुरूष आणि खोकडपुरा येथील 81 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.