AurangabadcoronaUpdate : जिल्ह्यात 36229 कोरोनामुक्त, 618 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 336 जणांना (मनपा 256, ग्रामीण 80) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 36229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 133 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37916 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1069 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 618 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपा पथकास 21 आणि ग्रामीण भागात 29 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (58)
ताडपिंपळगाव, देवगाव, कन्नड (2), यशवंत नगर, पैठण (3), रोटेगाव, वैजापूर (1), भग्गाव, वैजापूर (1), लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर (2), जांबरगाव, वैजापूर (1), वेरुळ, खुलताबाद (1), महालगाव, गंगापूर (1), लासूर स्टेशन परिसर (1), जामगाव , गंगापूर (1)तालपिंप्री, गंगापूर (1), शिवराई,कन्नड(1), जरंडी, सोयगाव (1), त्रिमुर्ती चौक, बजाज नगर (1), सिडको महानगर (1), साई मंदिर, बजाजनगर (1), अन्य (1), सावरकर कॉलनी , बजाजनगर (1), भवानी चौक, बजाज नगर (1), बजाज नगर (1), आमखेडा सोयगाव (2), पान्होरा सिल्लोड (1), बाळापूर (2), औरंगाबाद (1), फुलंब्री (1), गंगापूर (4), खुल्ताबाद (3), सिल्लोड (15), वैजापूर (4), पैठण (1)
मनपा (54)
चेतना नगर (1), जालान नगर (1), नक्षत्रवाडी (1), साई नगर, नारेगाव (1), मिलिट्री हॉस्पिटल (3), न्यू हनुमान नगर (2), एन 9 हडको (3), मातोश्री नगर, गारखेडा (1), किलेअर्क, बौद्धविहार (1), म्हाडा कॉलनी,बाबा पेट्रोलपंपाजवळ (1), सदाशिव नगर, रामनगर (1), हर्ष नगर, लेबर कॉलनी (1), राधास्वामी,कॉलनी, जटवाडा रोड, हर्सूल (1), गुलमंडी (1), जवाहर कॉलनी, गारखेडा (1), रेणूका माता मंदिर, एन 9 (1), मंगेश गॅस एजन्सी, एन 8 (1), श्रीराम नगर (1), मुकुंदवाडी (2), प्रताप नगर (1), कैलास नगर (1), एन 13 भारतमाता नगर, हडको (1), टिव्ही सेंटर (1), सुतगिरणी चौक् (1), सेव्हन हिल (1), सदाशिव नगर, धूत हॉस्पिटलजवळ (2), गारखेडा (1), होनाजी नगर हर्सूल (1), मनीषा कॉलनी, खोकडपुरा (1), क्रांती चौक समाज मंदिर जवळ (1), घाटी परिसर (3), राठेगाव, हजारे (1), मयूर नगर (1), गरम पाणी (4), तापडिया नगर (1), सातारा परिसर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), बीड बायपास (1), अन्य (4)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दिवाणदेवडी येथील 62 वषीय स्त्री, हिलाल कॉलनीतील 68 वर्षीय पुरष, वानखेडे नगरातील 52 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.