Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : बहुचर्चित अभिनेत्री पायल घोष यांचा आठवलेंच्या रिपाइं मध्ये प्रवेश

Advertisements
Advertisements
Spread the love

बहूचर्चित अभिनेत्री  राखी सावंत यांच्यानंतर  दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषने राजकारणात एन्ट्री घेतली आहे. पायलने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  मध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले  यांच्या उपस्थिती पायलचा पक्षप्रवेश झाला. पायलसोबतच तिचे वकीलही रिपाइंमध्ये प्रवेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले . या प्रवेशाबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले कि , आम्ही नेहमीच ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी आवाज उठवतो. त्यामुळे पायल घोष यांनाही न्याय मिळाला पाहिजे हि आमची भूमिका आहे. ‘या दरम्यान जेव्हा पायलशी आमची चर्चा झाली तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं कि, जर तुम्ही आरपीआयमध्ये आलात तर आमच्या पक्षाला एक चांगला चेहरा मिळेल. त्यानंतर पायलनेही पक्षप्रवेश करण्यास तयार असल्याचं सांगितलं आणि हा पक्ष प्रवेश झाला.

Advertisements

यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ‘कायद्यानुसार पायलवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही पायल घोषसोबत आहोत. याप्रकरणी मला पश्चिम बंगालमधूनही फोन आले होते. पायल पश्चिम बंगालची आहे. तुम्ही मुंबईत राहता. तुम्ही त्यांना पाठिंबा द्या, असं मला सांगण्यात आलं. मी सांगितलं त्यांना की, मला हे सगळं सांगण्याची गरज नाही. मला सगळं माहिती आहे. त्यामुळे या अभिनेत्रीला पाठिंबा देण्याची आमची जबाबदारी होती. त्यामुळेच आम्ही पायल घोषला पाठिंबा दिला. तसेच अनुराग कश्यपला लवकरात लवकर अटक करण्यात यावी हिच आमची मागणी आहे.’

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!