Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionCrime : बिहार निवडणुक प्रचारात हिंसाचार , गोळीबारात उमेदवार ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

पहिल्या टप्प्यातील बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून  विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत . दरम्यान काल झालेल्या हिंसाचारात जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांच्यावर काही लोकांनी गोळीबार केल्यामुळे त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बिहारच्या शिवहर जिल्ह्यातील हाथरस येथे ही घटना घडली असून जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांच्यावर शनिवारी काही लोकांनी गोळीबार केला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तात्काळ एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, गंभीर दुखापत झाल्याने उपचारांदरम्यान नारायण सिंह यांचा मृत्यू झाला. यावेळी आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारण हल्ल्यात ते देखील जखमी झाले आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!